गुहागर : भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम करत असताना साईट पट्ट्यांसह रस्त्याचे नुकसान

banner 468x60

गुहागर तालुक्यात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत.

संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे होणाऱ्या बाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी कार्यकारी अभियंता,विभाग चिपळूण,महावितरण कंपनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.

सदर दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील समुद्रालगत असलेल्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या सुरु आहे.त्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईट पट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

परिणामी रस्त्याचा पृष्ठभाग नादुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत गटारात टाकलेल्या भूमिगत विद्युत वाहिन्यामुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते, केबल दुर्घटनेमध्ये सतीश घाणेकर या तरुणाचा काही वर्षापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता .

एखाद्या व्यक्तीची गंभीर घटना घडल्यावर प्रशासन लक्ष देईल का…? महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समोरच चुकीच्या पद्धतीने काम होत असताना हे अधिकारी व त्यांचे कर्मचारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे निदर्शनात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *