गुहागर: उमराठ ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम महिला बचत गटांना दिले ‘धिंगरी अळिंबी’ उत्पादनाचे प्रशिक्षण

banner 468x60

गुहागर : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ महिला बचत गटांसाठी नाविन्यपूर्ण अळिंबी उत्पादन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

banner 728x90

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.​​सोमवार,

दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी महापुरुषांच्या कार्याचा गौरव केला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या जडणघडणीत दिलेले योगदान आणि स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांसाठी कसे प्रेरणादायी आहेत,

यावर त्यांनी प्रकाश टाकला.​​बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी ‘नलावडे मशरूम फार्म’चे मालक ऋषिकेश नलावडे आणि गौरव नलावडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.​

पीपीटी प्रेझेंटेशन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अळिंबी उत्पादन कसे घ्यावे,याची सखोल माहिती देण्यात आली.​अळिंबी (मशरूम) शाकाहारी आहे की मांसाहारी?

यासारख्या समाजात असलेल्या विविध गैरसमजांवर त्यांनी तांत्रिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.​उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची विक्री कशी करावी आणि मार्केटिंगची रणनीती कशी असावी,

याचेही धडे महिलांना देण्यात आले.​या प्रशिक्षण शिबिरासाठी उमराठ परिसरातील विविध बचत गटांच्या सुमारे ६० ते ७० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

गावच्या विकासासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास सरपंच आंबेकर यांनी व्यक्त केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, संगणक परिचालक साईस दवंडे तसेच बचत गटाच्या सीआरपी श्रुती कदम आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“बचत गटातील महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि गावातील तरुणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारातून गाव समृद्ध करण्यासाठी पुढे यावे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”— जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रामपंचायत उमराठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *