गुहागर : तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू

Screenshot

banner 468x60

गुहागर तालुक्यातील तळवली येथे कपडे
धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज (३ सप्टेंबर) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रेखा गणपत कांबळे (वय ४७, रा. तळवली छोटी बौद्धवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

गुहागर

banner 728x90


सकाळी साडेसातच्या दरम्यान त्या कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या; मात्र काही वेळाने त्या नदीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. नदीकिनारी स्मशानशेड असल्याने येथे गेलेल्या काही ग्रामस्थांना सकाळी मृतदेह दिसून आला. त्यांनी त्वरित येथील पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली. पोलिस पाटील घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती गुहागर पोलिसांनी कळवली.


पोलीस उपनिरीक्षक एस. के. भोपळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व तळवलीचे बीट अंमलदार तडवी, नेमळेकर,. शेट्ये आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *