गुहागर नगरपंचायत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान या माध्यमातून करण्यात आलंय.
स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वछता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले आहेत. त्यानुषंगाने गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २१ संप्टेंबरला सकाळी 8 वाजता स्वच्छता ही सेवा अंतर्गत गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात स्वच्छता गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, गुहागर नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, शहर समन्वयक अक्षय सावंत, स्वच्छता विभाग
लिपिक सुनील नवजेकर, गुहागर हाय स्कूलचे मुख्याध्यापक कांबळे , गंगावणे , अविनाश गमरे, कांबळे , पाकले , तांबड , NCC चे ढोणे तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे आणि त्यांचे सहकारी प्रसाद वैद्य, सचिन मुसळे, मर्दा शेठ,
निखिल तांबट वगुहागर नगरपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुहागर हायस्कूल विद्यार्थी, NCC विद्यार्थी, लायन्स क्लब, नगरपंचायत आणि तहसील ऑफिस चे अधिकारी व कर्मचारी वर्ग असे एकूण 250 जणांनी सहभाग घेतला.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*