गुहागर : कोंडवाडी चषक च्या तरुणांकडून निवारा शेडला रंगरगोटी

banner 468x60

शृंगारतळी (वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील कोंडवाडी चषक च्या मुलांनी साळवी स्टॉप येथील निवारा शेडची दुरुस्ती करून रंगरगोटी केली.

banner 728x90

तसेच साळवी स्टॉपचा असलेला बोर्ड नवीन बसविण्यात आला. यावेळी कोंडवाडी चषकचे नितेश पागडे, आशिष तेलगडे, आदित्य तेलगडे, विजय पागडे, सागर पागडे,

अमोल पागडे, प्रसाद घाणेकर, सुजल गावडे, सुजल पगडे, सूरज पागडे, ब्रम्हानंद तेलगडे, रोहित रांजणे, सुशील तेलगडे, संकेत रावणंग , सोहम पागडे, सूरज तेलगडे, रुपेश तेलगडे, प्रफुल्ल तेलगडे, ओंकार खैर आदींनी मेहनत घेतली.

कोंडवाडी चषकच्या तरुणांनी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे प्रवाशांनी कौतुक केले आहे. कोंडवाडी चषक ही क्रिकेटपुरतीच मर्यादित नसून या कोंडवाडी चषकातील मुलांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करणे, रस्त्याची साफसफाई करणे, स्वच्छता मोहिम असे विविध उपक्रम राबविले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *