गुहागर : विवाहितेला धमकी आणि शिवीगाळ, गुन्हा दाखल

banner 468x60

पिंग्मी संकलन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जानवळे येथील विवाहितेजवळ अश्लिल भाषेत बोलत, धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे याच्यावर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90


गुहागर तालुक्यातील एका पिग्मी संकलन करणाऱ्या महिलेने गुहागर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे हा तरुण, तु मला खुप आवडतेस, माझ्याशी फोनवर बोल, अन्यथा घरी येऊन राडा करेन, तु मला भेटायला ये, शृंगारतळी येथे भाडयाची रूम घेऊ रहा.

अन्यथा तुला संपवून टाकेन असे सांगत अश्लिल शिवीगाळ करत असे. त्याचबरोबर पिग्मी संकलनासाठी गेल्यावर माझी पाठलाग धरत असे. एके दिवशी त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला. याबाबत चुलत दिरांना मी सांगितले. त्यांनी फोन केल्यानंतर शिंदेने त्यांनाही शिवीगाळ केली.

त्यानंतर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी संबंधित पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे हा तू मला खूप आवडतेस, माझ्याशी फोनवर बोल, अन्यथा घरी येऊन राडा करेन, तू मला भेटायला ये, शृंगारतळी येथे भाड्याची रूम घेऊन राहा, अन्यथा तुला संपवून टाकेन, असे सांगत अश्लिल शिवीगाळ करीत असे.

त्याचबरोबर शृंगारतळी येथे पिग्मी संकलना गेल्यावर माझी पाठलाग धरत असे. त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला. चुलत दीर याने फोन केल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करीत दोन तासाने मोबाईल आणून दिला. या प्रकाराला कंटाळून अखेर १८ जानेवारी रोजी मी माझ्या पतीला हा प्रकार सांगितला.

१९ जानेवारी रोजी याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, गुहागर पोलिसांनी याप्रकरणी उमेश शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ७८, ७९, ३५१ (१) व ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉस्टेबल लुकमान तडवी अधिक तपास करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *