दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त,नेहरू युवा केंद्र रत्नागिरी ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर आणि गुहागर नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर ‘ स्वच्छ सागर सुरक्षित सागर ‘ अभियानांतर्गत महाविद्यालयाच्या एनएसएस विभागा अंतर्गत एनएसएस स्वयंसेवकांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली
यावेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संदीप भोसले संचालक मनोज पाटील एन.एस.एस. विभाग कार्यकारी प्रमुख प्रा. डॉ. सोळंके , प्रा. निळकंठ भालेराव , प्राध्यापिका आर. एस. आडेकर , प्रा. डॉ. आनंद कांबळे त्याचप्रमाणे एन.एस.एस. विभागाचे विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी श्काशिनाथ गावित उपस्थित होते .
सदर स्वच्छते मोहिमेसाठी एन.एस.एस.स्वयंसेवकांसाठी कचरा गोळा करण्यासाठी हॅन्ड ग्लोज आणि डस्टबिन बॅग इत्यादी साहित्य पुरवण्यात आले होते. एन.एस.एस. स्वयंसेवकांनी यादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या प्लास्टिक बॅग , काचेच्या बॉटल्स , थर्माकोलचे तुकडे त्याचप्रमाणे प्लास्टिक बॉटल्स व इतर कचरा डस्टबिन बॅगांमध्ये गोळा केला.
या उपक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत… अशा आवाजात स्वच्छता विषयक जनजागृती केली . यावेळी नगरपंचायतिचे सी.ओ. स्वप्निल चव्हाण, गुहागर एज्युकेशन चे सेक्रेटरी संदीप भोसले संचालक मनोज पाटील शहर समन्वयक अक्षय सावंत , स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गायकवाड , यांनी उपक्रम दरम्यान प्रत्यक्ष भेटून एन.एस.एस. विभाग आणि सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले .
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*