गुहागर-चिपळूण महामार्गावर दोन कारचा अपघात

banner 468x60

गुहागर – चिपळूण महामार्गावर काल रात्री १५ सप्टेंबर रोजी एक गंभीर अपघात घडला. मार्गताम्हाणे जवळील समर्थ नर्सरी उताराजवळ, रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे ही दुर्घटना झाली आहे.

banner 728x90 banner 728x90

गुहागरकडून चिपळूणकडे जात असलेल्या कारने ईरटीका वाहनाला जोरदार धडक दिली.


या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, वाहन एका बाजूला कोसळले. अपघाताच्या स्थळी थेट बॅरिकेट देखील उडाले आहेत. दुर्घटना होण्यामागे मुख्य कारण म्हणून रस्त्यावर असलेले उथळ खड्डे आणि रखडलेले मार्गकाम सांगितले जात आहे.

या भागात सतत अपघात होण्याची घटना झाल्यामुळे स्थानिक नागरिकांत संतप्त नाराजी पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, नाहीतर आणखी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली आहे.


“अत्यंत धोकादायक अशी ही परिस्थिती लवकर दुरुस्त करावी! मार्गताम्हाणे भागातील कामे लवकर पूर्ण करावी, नाहीतर अधिक जीवितहानी होण्याची शक्यता आहे,” असे स्थानिकांनी म्हटले आहे.
प्रशासनाची पावले काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *