गुहागर : अंजनवेल कातळवाडी गावांत एसटी बस नाही, बस गावात येत नसल्याने प्रवाशी, विद्यार्थ्याचे नुकसान

banner 468x60

‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ या घोषणेची गुहागर आगारात वाणवा पाहायला मिळत आहे. गुहागरमधून सुटणारी अंजनवेल कातळवाडी बस गावांत अद्याप पोहोचलेली नाही.

banner 728x90

दिवसातून चारवेळा येणारी बस कधी 1 वेळा तर कधी दोनचवेळा येते आणि जरी आली तरी ती कातळवाडी आणि अंजनवेल गावात येत नसल्याची तक्रार गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

कातळवाडी आणि अंजनवेल गावांतील प्रवाशांकडून आता एसटी बसची मागणी होऊ लागली आहे. गुहागर आगाराला गावांत एसटीला आजही सेवा देता आलेली नाही. एसटीच्या याच उणीवांचा फायदा घेत खासगी वाहतुकीचा पर्याय उभा राहिला असून एसटीच्या हक्काच्या प्रवाशांची आता थेट पळवापळवी सुरू झाली आहे.

त्यामुळे निदान दिवसातून 4 वेळा तरी एसटी येण्याची मागणी केली असून बाहेरुन जाणाऱ्या गाड्यांपैकी काही बस कातळवाडी आणि अंजनवेल मार्गे वेळदूर जरी गेल्या तरीही त्याचा फायदा गावातील लोकांना होईल असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

सर्वसामान्य प्रवासी खात्रीशीर प्रवासासाठी कायमच एसटीला प्राधान्य देत आले आहेत. परंतु, प्रवाशांना सेवा देण्यात एसटी मात्र कमीच पडत आहे. ग्रामीण भागात एसटीलाच प्राधान्य दिले जाते. इतर वाहतुकीची फारशी साधने उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी तासन् तास एसटीची वाट पाहत बसतात.

अशी स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे मात्र प्रवाशांपर्यंत पोहोचण्यात एसटीला अडचणी येत आहेत. गावात जाण्यासाठी एसटीला जास्त अंतर कापावे लागत असल्याने सेवा परवडत नाही, असे सांगण्यात येते.

पुरेसे प्रवासी मिळत नसल्यानेही फेरी सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या गावाला बस द्या अशी मागणी अंजनवेल आणि कातळवाडी ग्रामस्थांनी गुहागर आगाराकडे केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *