गुहागर : आगाराला मिळणार 15 नव्या बसेस

banner 468x60

गुहागर आगारात असणार्‍या बसेस या खुप जुन्या असून गेली १०-१२ वर्ष या आगारासाठी नवीन बसेस पुरविण्यात आलेल्या नाहीत.

banner 728x90 banner 728x90

आता आगारात असणार्‍या बसेस या खुप जुन्या झाल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अनेक बसेस गळक्या असून पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची गरज भागवली जाते.

हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला १५ नव्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना नेते, मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यासंबंधीचे पत्र आमदार जाधव यांनी देताच सरनाईक यांनी ही मागणी मान्य करून तत्काळ संबंधितांना निर्देश दिले.

मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आज आ. जाधव यांनी ना. सरनाईक यांची भेट घेतली.

त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि जुन्या झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस बंद करून शिवाई, शिवनेरी यासारख्या नव्या गाड्या द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. तीदेखील सरनाईक यांनी मान्य केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *