दाभोळ : ए.के.आय. दाभोळच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव

banner 468x60

ए.के.आय. दाभोळच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जार्फ एमएचओ समूह, दुबई यांच्या वतीने दाभोळ येथे भव्य पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत सर्वोत्तम कामगिरी करावी, त्यांना योग्य प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

banner 728x90 banner 728x90

या कार्यक्रमासाठी जार्फ एमएचओ समूहाचे संस्थापक व ए.के.आय. दाभोळचे माजी विद्यार्थी. झाकीर हुसेन चौगले यांचे ज्येष्ठ बंधू हाफिज कलीमुद्दीन चौगले, पत्नी मेहजबीन चौगले तसेच चिरंजीव उमर चौगले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हाफिज कलीमुद्दीन चौगले यांच्या पवित्र कुराण पठणाने करण्यात आली. उमर चौगले यांनी सादर केलेल्या कवितेने उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्यात दाभोळ परिसरातील डॉक्टर, हाफिज, शिक्षक, समाजसेवक तसेच शाळेच्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सन २०२५ च्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


जार्फ एमएचओ समूहाची स्थापना झाकीर हुसेन चौगले यांनी गरजू व वंचितांच्या सेवेसाठी तसेच आपल्या आई-वडिलांच्या इच्छेला आदरांजली म्हणून केली आहे. ‘जार्फ’ या अरबी शब्दाचा अर्थ सहनशीलता, मनाची विशालता व जबाबदारी स्वीकारणे असा होतो, तर एमएचओ म्हणजे वैद्यकीय मदत संस्था.

या कार्यक्रमात सुमारे 150 स्मृतिचिन्हांचे वितरण करण्यात आले. सर्वप्रथम दाभोळ परिसरातील डॉक्टरांचा त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी गौरव करण्यात आला. यामध्ये दाभोळच्या पहिल्या महिला डॉक्टर व वर्षभर अखंड सेवा देणाऱ्या डॉ. सबीहा बालाभाई सरखोत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. गझल गायनासाठी स्वालिहा बारगीर, कव्वाली ‘काली काली जुल्फे’ साठी ताल्हा दर्वेश, सादिम नाखवा व मुआझ मुजावर, नात गायनासाठी अहमद बामणे, ‘अनपढ नेताजी’ नाटकासाठी अरहान सोलकर व अनस बामणे, ‘बेटियों की अहमियत’ नाटकासाठी जोहा फडणीस व सारा मुजावर, तर ‘मुगल-ए-आझम’ कव्वालीसाठी आफिया दर्वेश यांना सन्मानित करण्यात आले.


कोकणी नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी तैमिना दर्वेश हिला सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्कार देण्यात आला. हे नाटक अफरीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले होते.

या प्रसंगी शाळेला तसेच मुख्याध्यापक फजलुद्दीन बामणे यांना विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकवृंदाचाही गौरव करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहजबीन चौगले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थित पाहुणे व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले. सर्वार्थाने हा सन्मान सोहळा प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आफरीन शेख . मुजम्मील खतिब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *