चिपळूण : नगर परिषदेच्या नव्या इमारतीसाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर

banner 468x60

चिपळूण नगर परिषदेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देण्याची घोषणा केल्यानंतर ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. या निधीमुळे नगर परिषदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी कामे लवकरात लवकर सुरू केली जातील, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

banner 728x90

याच दिवशी नगरपरिषदेच्या साने गुरुजी उद्यानात देशभक्त पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांचा १२५व्या जयंतीनिमित्त पुतळा अनावरण करण्यात आला. या कार्यक्रमास पालकमंत्री उदय सामंत, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार सदानंद चव्हाण, सर्वनगरसेवक, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी साने गुरुजींच्या योगदानाची माहिती दिली. साने गुरुजी चिपळूणमध्ये दोनवेळा आले होते; त्यांनी वीरेश्वर मंदिरात खालच्या व सवर्ण वर्गातील लोकांना एकत्र आणून सहभोजनाचा कार्यक्रम राबवला आणि स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, जसे की श्यामची आई, जी मुलांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न आपालिकेच्या माध्यमातून होईल. 

पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “साने गुरुजींचा पुतळा आज उद्यानात उभारल्याचा आनंद आहे. नगर पालिकेसाठी निधी मिळाल्यामुळे शहराच्या विकास कामात वेग येईल आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळतील. भविष्यात नेते किंवा निधीची कमतरता पडणार नाही.”
नगर पालिकेच्या इमारतीसाठी मंजूर झालेला निधी ही शहराच्या विकासासाठी एक मोठी पायरी ठरेल, तर साने गुरुजींचा पुतळा शहरवासियांना प्रेरणा देईल, असे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त केले गेले. कार्यक्रमाला नगरसेवक शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, वाचनालयाचे सर्व संचालक, माजी नगरसेवक विजय चितळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *