चिपळूण : वाघीवरे येथे ‘अपना सहयोग फाउंडेशन’तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, 83 रुग्णांची तपासणी, मोफत औषधांचे वितरण

banner 468x60

ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘अपना सहयोग फाउंडेशन’ तर्फे वाघीवरे येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा एकूण ८३ रुग्णांनी लाभ घेतला. यापैकी ५० रुग्णांची ईसीजी, डायबेटीस आणि हिमोग्लोबिन तपासणी मोफत करण्यात आली.

banner 728x90


शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, सामान्य वैद्य आणि शल्यचिकित्सक डॉक्टर उपस्थित होते. सर्व रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. डॉ. अभिजीत सावंत, डॉ. मनस्वी यादवडॉ. मैथिली पल्लव, प्रद्नेश पडवळकर (PRO), दीप्ती भुवड – सिस्टर, चिन्मयी चालके – सिस्टर, साई चव्हाण – सिस्टर, कल्पेश – वॉर्ड बॉय यांची शिबिराला उपस्थिती होती.


‘अपना सहयोग फाउंडेशन’च्या अध्यक्षा जरीन रुमानी यांनी सांगितले की, “अशा प्रकारची मोफत वैद्यकीय शिबिरे दर महिन्याला वाघीवरे गावात आयोजित करण्यात येतील. गावकऱ्यांना मोफत औषधे आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.”


जरीन रुमानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, महिलांचे सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती यासाठी विविध उपक्रम राबवले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना स्वावलंबन व रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.


या उपक्रमात हनीफ सबले, रफीक झुमरकर, बब्बल आणि मीना शिवकर (अपना सहयोग फाउंडेशन वाघीवरे कोऑर्डिनेटर) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिबिराचा उद्देश गरजू लोकांना मदतीचा हात देणे आणि प्रत्येक गावकऱ्याला मूलभूत आरोग्यसेवा व मोफत औषधे उपलब्ध करून देणे हा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *