शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले.
मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या जडणघडणीत आप्पा साळवी यांचे महत्त्वाचे योगदान होते.
रत्नागिरी जिल्ह्यात संघटनवाढीसाठी आप्पा साळवी यांनी मेहनत घेतली होती. सर्वप्रथम ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते.
त्यानंतर 1990 च्या काळात ते रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख होते. 1995 ला राजापूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













