खेड : मधुमेह रुग्णांसाठी ‘D.A.P.H’ क्लबची स्थापना, परशुराम हॉस्पिटल आणि अमनोरा एस्स फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

banner 468x60

घाणेखुंट–लोटे (ता. खेड) : मधुमेह हा आजच्या काळातील गंभीर व वाढता आजार लक्षात घेता, रुग्णांना योग्य उपचार, मार्गदर्शन व जीवनशैली बदलाबाबत सातत्याने मदत मिळावी या उद्देशाने एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटल आणि अमनोरा एस्स फाउंडेशन सिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने D.A.P.H (डायबिटीस असोसिएशन ऑफ परशुराम हॉस्पिटल) या मधुमेही रुग्णांच्या विशेष क्लबची स्थापना करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

या उपक्रमांतर्गत मधुमेह नियंत्रणासाठी विशेष बाह्य रुग्ण विभाग (Diabetes OPD) सुरू करण्यात आला असून, रुग्णांना नियमित तपासणीसह तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, योगोपचार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ओपीडीमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून सेवा दिली जाणार आहे.

या विशेष उपक्रमात मधुमेही रुग्णांची रिकामा पोटी तसेच जेवणानंतर रक्तातील साखर तपासणी, लघवी तपासणी करण्यात येणार असून, आजार नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपचार पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. रुग्णांच्या गरजेनुसार आयुर्वेदिक तसेच आधुनिक वैद्यकीय उपचारांचा समन्वय या उपक्रमात ठेवण्यात आला आहे, ही या उपक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

यासोबतच दर महिन्याला मधुमेहाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टर, वैद्य व आरोग्य सल्लागारांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात येणार आहे. रुग्णांनी केवळ औषधांवर अवलंबून न राहता आहार, व्यायाम, योग आणि जीवनशैलीत बदल करून मधुमेह नियंत्रणात ठेवावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

तसेच रुग्णांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या तपासण्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. सहा महिन्यांतून एकदा किडनी कार्य तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी, लिव्हर फंक्शन टेस्ट तसेच HbA1c तपासणी केली जाणार असून, त्यानुसार पुढील उपचार व सल्ला दिला जाणार आहे.

या उपक्रमासाठी सभासद नोंदणी सुरू असून, मधुमेही रुग्णांनी या क्लबचे सभासद होऊन या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व सभासदत्व निश्चित करण्यासाठी डॉ. अशोक शिंदे (मो. ९४२२६३५४८) तसेच सौ. सुष्मिता पाटील (मो. ७७७५९७२४४१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *