दापोली : पालगड हायस्कूलमध्ये उत्साहात शिक्षक-पालक सभा; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

banner 468x60

पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर, पालगड येथे इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा कलामंदिरमध्ये उत्साहात पार पडली.

साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक रत्नाकर गुरव, विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्य संभाजी साळवी, पालक प्रतिनिधी पंढरीनाथ मुंगशे . सानिका भडवळकर यांचे मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

banner 728x90

मुख्याध्यापकांनी सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबईतर्फे 213 विद्यार्थ्यांना झालेल्या स्कूल-किट वाटपाबद्दल माजी विद्यार्थिनी मनाली सुनिल बुटाला हिचे विशेष आभार मानले. तसेच झोलाई स्पोर्ट्स आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला—

  • वेद प्रमोद चव्हाण (10 वी) – तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
  • अन्वय प्रसाद पावशे – दोन स्पर्धांत उत्तम कामगिरी
  • श्रद्धा गणपती निकम (10 वी) व यश दिनेश गुरव (9 वी) – गणित प्रश्नमंजुषेत प्रथम
  • 14 वर्ष वयोगट व्हॉलीबॉल (मुले-मुली) – विभागीय सहभाग
  • आदर्श ग्रंथपाल विवेक महाडिक यांचा गौरव

रोटरी क्लब व श्री संदीप खोचरे यांच्या पुढाकारातून केरळमधील शिक्षकांनी विज्ञान प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण केली.

इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेतील ताण, वेळ व्यवस्थापन, आहार, झोप, व्यायाम व ध्यान यावरील मार्गदर्शन सचिदानंद कुंटे यांनी दिले. तसेच कॉपी मुक्त अभियान, वार्षिक आरोग्य तपासणी, स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धांची माहिती पालकांना देण्यात आली.

इयत्ता 10 वीचा सहामाही निकाल जाहीर करण्यात आला व पालकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी–पालक–शिक्षक या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित करून मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त केले.

सभेचा समारोप जेष्ठ शिक्षक
दत्तप्रसाद गुरव यांनी आभार प्रदर्शनाने केला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *