रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक १६ मार्च रोजी

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया १६ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ व त्याखालील नियमांनुसार ही निवडणूक दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद सभागृह येथे होणार आहे.

banner 728x90 banner 728x90

यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली असून, या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) विश्वजित गाताडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ४५ (पोटकलम २) अन्वये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची ही पहिली विशेष सभा असून, निवडणूक प्रक्रियेसाठी अपर जिल्हाधिकारी यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाला असून, अधिनियम १९६२ च्या कलम ६६ नुसार जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

अधिनियमानुसार पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा घेऊन, या विशेष सभेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे १६ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *