संगमेश्वर : कुरधुंडा येथे डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे डंपरने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक दिली. गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

आकिब इबजी (रा. मजगाव, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले.

यावेळी संतप्त जमावाने डंपर चालकाला चोप दिला. मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचेकाम सुरू आहे. हे काम करणार्‍या कंपनीतील डंपर चालकांचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढत आहे.

गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीस्वार (एमएच 08 एई 6941) रत्नागिरीच्या दिशेने येत होता. यावेळी संगमेश्वरच्या दिशेने जाणार्‍या म्हात्रे कंपनीच्या या डंपरने दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेला जाऊन जोरदार ठोकर दिली.

समोरून दुचाकीला धडक दिल्याने डंपरचे चाक दुचाकीस्वाराच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले.

त्यांनी दुचाकीस्वाराला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *