देवरुख : पाटगाव येथे दुचाकीची ट्रॅव्हल्सला धडक एक गंभीर जखमी

banner 468x60

रत्नागिरी–देवरुख मार्गावरील पाटगाव घाटी भालेकर स्टॉप येथे दुचाकीला झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर धडक दिल्याने हा अपघात घडला. यश संतोष महाडिक (रा. निवे बुद्रुक, वय 24 ) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, यश महाडिक हा सकाळी सुमारे आठच्या सुमारास आपल्या ताब्यातील नवीन दुचाकीवरून निवे बुद्रुक येथून देवरुखच्या दिशेने निघाला होता. पाटगाव घाटी परिसरातील भालेकर स्टॉप येथे एका चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना देवरुखकडून रत्नागिरीकडे येणाऱ्या नॅशनल ट्रॅव्हल्स बसशी त्याची समोरासमोर धडक झाली.धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीस्वार यश महाडिक रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी येथे उपचारासाठी हलवले.


चिरायू हॉस्पीटल येथे ऍडमिट केले असता अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले. दरम्यान, या अपघातात यश महाडिक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *