रत्नागिरी शहरालगतच्या एकदंतनगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच/०८/एएन/८९०४ क्रमांकाची इर्टिगा कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. वाहनाला बाष्प धरल्याचे दिसत होते. खबर देणाऱ्या व्यक्तीने गाडीत डोकावून पाहिले असता चालकाच्या सीटवर सीट मागे घेतलेल्या अवस्थेत एक व्यक्ती झोपल्यासारखी दिसली.
संशय आल्याने स्थानिकांच्या मदतीने वाहनाची काच फोडण्यात आली. मात्र संबंधित व्यक्तीकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचेही दिसून आले. तत्काळ त्यांना त्याच वाहनातून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दुपारी १२.३० वाजता उपचारापूर्वीच मृत झाल्याचे
घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख वैभव जयप्रकाश सांतदेसाई (वय ४३, रा. नवेदरवाडी, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) अशी पटली आहे. या प्रकरणी आमू. क्रमांक १४/२०२६ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















