चिपळूण : राधा लवेकरला अटक करण्याची मागणी

banner 468x60

चिपळुणातील राधा लवेकर या महिलेने तालुक्यातील अनेक महिलांना सावकारीच्या माध्यमातून फसविले आहे व आर्थिक फसवणूक केली आहे.

banner 728x90

तसेच वसुलीसाठी विविध प्रकारचा त्रास दिला आहे. त्यामुळे या महिलेवर लवकरात लवकर पोलिस कारवाई करावी व तिला अटक करण्यात यावी, अशी मागणी चिपळूण तालुका उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख धनश्री शिंदे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन दिले.


या महिलेविरोधात अॅट्रॉसिटी व बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तिला तत्काळ शोधून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी धनश्री शिंदे, शहरप्रमुख वैशाली शिंदे, शहर समन्वयक श्रद्धा घाडगे, शिवानी कासार, दीप्ती सावंतदेसाई, तेजस्वी किंजळकर, सुप्रिया शिंदे, अमिता कानडे, सानिका टाकळे, सोनाली चव्हाण, सायली कदम, जयश्री सकपाळ, धनश्री खंडजोडे, वृषाली घाणेकर, रेश्मा चव्हाण, नंदिनी पड्याळ आदी महिला उपस्थित होत्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *