इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणमधील सरकारी वाहिनीनं केला आहे. त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचा दावा केला होता.
शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला आहे.
रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘ट्रुथ सोशल’वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला.
त्यावेळी इराणची वृत्तसंस्था असलेल्या ‘फार्स’नं म्हटलं होतं की, अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे आणि तो अमेरिकेच्या ‘सायकॉलॉजिकल वॉर’चा भाग आहे, असं जाणकार सूत्रांनी सांगितलेलं आहे.
इराणच्या शेवटच्या शाह (राजा) यांचे निर्वासित सुपुत्र रझा पहलवी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या दाव्याचं स्वागत केलं आहे.
“हजारो इराणी लोकांना मारणारे खामेनी आता इतिहासाचा एक भाग बनलेले आहेत,” असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.
पहलवी म्हणाले की, “त्यांच्या मृत्यूने इस्लामिक रिपब्लिकचा प्रभाव आता संपला आहे.”या सगळ्या घडामोडींवर चीननं चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत चीनचे राजदूत फू काँग म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचा देश खूप चिंतेत आहे.
दुसऱ्या बाजूला, वॉशिंग्टनमधील नॅशनल सॉलिडॅरिटी ग्रुप ऑफ इराण मृतांच्या स्मरणार्थ वॉशिंग्टनमध्ये रॅलीचे आयोजन बऱ्याच काळापासून करत होता.
मात्र, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर रॅलीचे वातावरण उत्सवमय झालेलं आहे.
रॅलीतील बरेच लोक आनंदाने नाचत होते. काही जण मिठाई वाटत होते, काही जण फुले देत होते आणि बरेच जण एकमेकांना मिठी मारत होते.
रॅलीतील सहभागींनी “अमेरिका!” असे जयघोष करून सरकारचे आभार मानले.
इराणचा ‘विनाशकारी आक्रमणाचा’ इशारा
दरम्यान इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून नुकतंच एक निवेदन मिळालं आहे. त्यात त्यांनी अमेरिकेच्या तळांवर आणि इस्रायलवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.
“अमेरिकेची दहशतवादी तळं आणि आमच्या व्यापलेल्या प्रदेशांवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी आक्रमक कारवाई काही क्षणांतच सुरू होईल,” असं निवेदनात म्हटलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















