दापोली : विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील वाकवली (गवळवाडी) परिसरात विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना २५ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

banner 728x90

नीता विनायक खेडेकर (वय ३९, रा. सुशेरी, ता. खेड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मागील सुमारे १२ वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास नीता खेडेकर या आपल्या घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर खेड पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली.

दरम्यान, २५ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास वाकवली (गवळवाडी) येथील सुनील लक्ष्मण बिर्रवटकर यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच दापोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

ओळख पटविल्यानंतर हा मृतदेह बेपत्ता असलेल्या नीता खेडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण समजून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *