रत्नागिरी : क्रांतीनगर येथे चिमुकलीचा झोपेतच मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात एका १ महिना १२ दिवसांच्या चिमुकलीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना दि. ०५ डिसेंबर रोजी घडली. अफिफा हैदरअली सिरवार ( रा. क्रांतीनगर, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे या मृत मुलीचे नाव आहे. उपचारासाठी दाखल केल्यानंतर सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे तिला मयत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे सिरवार कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरअली सिरवार यांच्या पत्नीची २४ ऑक्टोबर रोजी सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे प्रसूती झाली होती. दि. ०५ डिसेंबर रोजी पहाटे ०५.३० वाजता मुलगी अफिफा झोपेतून उठली असता, तिच्या आईने तिला दूध पाजून परत झोपवले. त्यानंतर सकाळी ०७.३० वाजता मुलीची आई झोपेतून उठून अफिफा हिला पाहिले असता, तिची कोणतीच हालचाल होत नव्हती आणि ती बेशुद्ध झाली होती.


तातडीने चिमुकलीला उपचाराकरिता चौधरी हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला पाहून लगेच रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले. वडिलांनी मुलीला सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी ०८.४५ वाजता तिला मयत घोषित केले.

वैद्यकीय अहवालानुसार, मुलीच्या मृत्यूचे कारण ‘सेरेब्रोपल्मोनरी एडेमा’ असे नमूद करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद दुपारी १२.०६ वाजता करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १३३/२०२५ नुसार बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मयत मुलीचे वडील हैदरअली सहेन बाशा सिरवार हे या घटनेचे खबर देणारे आहेत.

Response (1)

  1. मृत मुली बदल संवेदना आहेत. पण हैदरअली बाशा सिरवार हे नाव वाचून जरा आश्चर्य वाटल.. देशात बेकायदेशीर बांगलादेशी चा सुळसुळाट आहे. तेव्हा हे कुटुंब मूळचे कुठले ? हे बांगलादेशी तर नाहीत ना, ह्याची माहिती पोलिसांनी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *