रत्नागिरी शहरातील मिरकवाडा बंदर येथील जेटी क्र. २ येथे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मिलिंद अनंत खेडेकर (वय ४६, रा. म्हाडा कॉलनी, कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास मिरकरवाडा जेटी क्र. २ येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद खेडेकर हे मिरकरवाडा जेटी क्र. २ येथे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत सापडले. नातेवाईकांनी त्यांनी उचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















