दापोली :मिहीर महाजन यांच्या पुढाकाराने दापोलीत रंगणार दापोली सांस्कृतिक महोत्सव

banner 468x60

१४, १५ ऑक्टोबरला भरगच्च कार्यक्रम दापोलीची ओळख ही भारतरत्नांची भूमी, नररत्नांची खाण आणि सांस्कृतिक नगरी त म्हणून अशीच सुपरिचित आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पा. वा. काणे, महषीं कर्वे इत्यादी भारतरत्न तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रँग्लर परांजपे इत्यादी महापुरुषांच्या वास्तव्याने दापोलीचा परिसर पूनित झाला आहे.

तसे सांस्कृतिक क्षेत्रात देखील येथील कलाकारांनी या दापोली येथे नाव पार सातासमुद्रापार नेले आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रायोजित करत असणारा हा दापोली सांस्कृतिक महोत्सव कै. कृष्णामामा महाजन स्मृतीप्रतिष्ठान कोळथरेच्या

माध्यमातून आणि मिहीर महाजन यांच्या संकल्पनेतून १४ आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृह या येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे १४ ऑक्टोबर वारकरी दिंडीपासून या महोत्सवाला सुरुवात होईल त्यानंतर शिवचरित्रावर आधारित ठइथे माराठीचीये नगरीठ हा मंदार परळीकर निर्मित सुप्रसिदध कार्यक्रम सादर होणार आहे.

तर १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वा. लोककलेचे सादरीकरण गायिका विदुषी मंजुषा पाटील यांचे गायन होणार आहे.

खालूबाजा, जाखडी, भजन आणि बरंच काहीया महोत्सवाला जोडूनच १४ आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत कै. कृष्णामामा महाजन स्मृतीप्रतिष्ठान कोळथरे मार्फत विविध कलास्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या स्पर्धामध्ये प्रामुख्याने स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या खालूबाजा, जाखडी नृत्य, भजन, कोकणातील लोककला, नाट्यछटा तसेच चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी आणि रील्स इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *