दापोलीत भाजपला धक्का, भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष स्वरूप महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश

banner 468x60

दापोली येथील स्वरूप महाजन यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.

banner 728x90 banner 728x90

दापोलीतील झालेल्या या पक्षप्रवेशावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महाजन यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वरूप महाजन यांनी दीर्घकाळ भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चामध्ये सक्रिय काम केले होते. मात्र स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाजन यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि दापोली तालुक्यात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे दापोली तालुक्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चा रंगल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *