दापोलीचे विद्यार्थी राज्यस्तरीय लाठी पंच परिक्षेत अव्वल

banner 468x60

दापोली तालुक्यातील केळशीचे ललितेश दवटे आणि पुर्विती दवटे महाराष्ट्र राज्यातील पहिले दांपत्य आहेत ज्यांनी राज्यस्तरीय लाठी पंच परिक्षा उत्तीर्ण केली आहे. देवी चव्हाण आईचा विशेष सत्काराने त्यांचा सन्मान झाला आहे.

banner 728x90


राज्यातील पहिले ठरलेले दांपत्य ललितेश दवटे व पुर्विती दवटे तसेच आपल्या दोन मुलींसह लाठी प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेतल्याबद्दल देवी चव्हाण यांचा भारतीय लाठी महासंघातर्फे विशेष सत्कार शिवराम भोसले यांचे हस्ते करण्यात आला.


23 मार्च रोजी छञपती शिवाजी विद्यालय नवी मुंबई येथे भारतीय लाठी महासंघामार्फत पार पडलेल्या प्रशिक्षण शिबीर व राज्यस्तरीय लाठी पंच परिक्षेत दापोलीतील विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून कविता शिंदे,देवी चव्हाण,आयुषी काटकर,वैष्णवी मिसाळ,नाविन्या सोनवाडकर,स्वराली रुके,अमोल धयाळकर,मूग्धा चव्हाण यांचेसह केळशी गावचे ललितेश दवटे व पुर्विती दवटे यांनी विशेष प्राविण्य मिळवले.

तसेच दिया चव्हाण,दिपिका चव्हाण,व अक्षरा माने यांनी यशस्वी रित्या प्रशिक्षण पूर्ण केले.
महिलांच्या संरक्षणाचा विचार करून लाठीच्या वेगवेगळ्या प्रहारांचा सराव करून घेण्यात आला.


सदर प्रशिक्षण भारतीय लाठी महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष शिवराम भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सचिव -गुरूवर्य अश्विन कडलासकर यांनी दिले. या प्रशिक्षण शिबिरास एकूण महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांतून व 4 राज्यांतून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
पंच परिक्षेच्या निकालावेळी महाराष्ट्र
लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष -उत्तम पाटिल,उपाध्यक्ष- संगम चव्हाण,सहसचिव- शामल आंजर्लेकर, कोषाध्यक्ष-प्रशांत पांदे,सदस्य- रूणाली पवार यांचेसह समस्त दापोलीकरांनी अभिनंदन केले असून वरिल सर्व विद्यार्थ्यांना भारतीय लाठी महासंघाचे उपाध्यक्ष व लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे सचिव सुरेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *