दापोलीमधील सर्वाधिक हाय व्होल्टेज आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये लढत निश्चित झाली आहे.
दापोलीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी भरत असताना सर्वच उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची गुंतवणुकीची माहिती द्यावी लागते.
दरम्यान उमेदवारी भरताना योगेश कदम यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची गुंतवणुकीची माहिती दिली आहे. योगेश कदमांची संपत्ती दहा-बारा नव्हे तब्बल ३७ कोटी इतकी आहे. योगेश कदम यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे
की पाच वर्षांमध्ये योगेश कदम यांच्या जंगम मालमत्तेत ४ कोटी ६३ लाख, स्थावर मालमत्तेत ३९ कोटी ३१ लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे पण याच वेळी कर्जातही ११ कोटी ५२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
योगेश कदमांची जंगम संपत्ती किती ते पाहा
योगेश कदम यांच्या मालकीची ७ कोटी रुपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६ कोटी ६० लाख ९९ हजार रुपये, मुलांच्या नावे ३९ लाख ७० हजार ६६ रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे.
जंगम मालमत्तेत रोख रुपये ८ लाख ९९ हजार, बँकेमधील गुंतवणूक व शेअर्समधील गुंतवणूक ३ कोटी ६९ लाख ८१९ रुपये असून ३३ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने आहेत. १ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपये इतके सोन्याचे दागिने आहेत. कुटुंबाची एकत्रित जंगम मालमत्ता १४ कोटी १ लाख ५ हजार ४२१ इतकी आहे.
योगेश कदमांची स्थावर मालमत्ता किती?
योगेश कदम यांच्या नावे शेतजमीन, बिगरशेतजमीन, व्यावसायिक व निवासी अश्या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत ४१ कोटी ९८ लाख २८ हजार इतकी आहे. कदम व त्यांच्या कुटुंबियांनी १५ कोटी ७० लाख ३३ हजार इतक्या रक्कमेचे कर्ज घेतले आहे. योगेश कदम यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरण पत्रात ८३ लाख ९६ हजार २६० इतके उत्पन्न दाखविले असून त्यांच्या पत्नीचे उत्पन्न १८ लाख ७९ हजार ३८० इतके आहे.
योगेश कदम यांनी शेती, सल्लागार आणि भूविकासक असे व्यवसाय करत असून पत्नी सिनेमा निर्माता असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. योगेश कदम हे तामिळनाडू राज्यातील अलगप्पा विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांनी २०१७ मध्ये बी.कॉम ही पदवी मिळवली असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*