दापोली : महिलेचा सोन्याचा ब्रेसलेट गहाळ, सापडल्यास संपर्क करण्याचे आवाहन

banner 468x60

दापोली : शहरात एका महिलेचा सोन्याचा ब्रेसलेट गहाळ झाल्याची घटना शनिवारी (दि. २८ मार्च) संध्याकाळच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित महिला आपल्या लहान मुलाला गार्डनमध्ये खेळण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला घरातून बाहेर पडून गार्डनकडे जात असताना किंवा गार्डन परिसरात असताना तिच्या हातातील सोन्याचा ब्रेसलेट निसटून पडला असावा. तसेच गार्डन ते आमदार हॉटेल या दरम्यानच्या रस्त्यावरही तो हरवला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ परिसरात शोध घेतला; मात्र ब्रेसलेट सापडले नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांमध्ये देण्यात आली असून, ज्यांना कुणाला हा ब्रेसलेट सापडेल त्यांनी तो परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्रेसलेट परत करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीस भरीव मोबदला दिला जाईल, असे संबंधित महिलेने स्पष्ट केले आहे.

तरीही, कोणाला हा सोन्याचा ब्रेसलेट आढळल्यास 9112691134 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनीही या शोध मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *