दापोली विंटर सायक्लोथॉन शॉर्ट सिटी लूप राईड उत्साहात संपन्न

banner 468x60

दापोली सायकलिंग क्लब आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन सिझन ६ मध्ये १० नोव्हेंबर रोजी १०००+ मीटर चढ उतार असणारी आव्हानात्मक ६५ किमी हॉर्नबिल सिनिक रुट राईड झाली.

यामध्ये देश विदेशातील अनेक नावाजलेले स्पर्धक सहभागी झाले होते. स्थानिक दापोली परिसरातील स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून १७ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित केलेली शॉर्ट सिटी लूप राईड स्पर्धा आणि फन राईड सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे उत्साहात संपन्न झाली.

यामध्ये ७ ते ६०+ वर्षे वयोगटातील १५०+ स्पर्धक सहभागी झाले होते. ४ किमीच्या शॉर्ट सिटी लूप राईड मार्गावर स्पर्धकांनी १ ते २५+ फेऱ्या मारत ४ ते १००+ किमी अंतर सायकल चालवली.

१००+ किमी अंतर सायकल चालवण्यासाठी सात तासांची वेळ मर्यादा देण्यात आली होती. पहाटे पाच वाजता सुरु झालेली ही राईड दुपारी १२ पर्यंत चालली. सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच ५०, ७०, १०० किमी सायकलिंग करणाऱ्यांना सर्वांना प्रत्येकी ₹२००, ₹३००, ₹५०० बक्षिस देण्यात आले.

अनेकांना सन्मानार्थ चषक, शालेय भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. नितीन बर्वे, मकरंद पुजारी, सार्थक मांडवकर, अद्वैत अमृते, अथर्व मांडवकर, प्रेम भुसारे यांनी १००+ किमी सायकल चालवली. निशा शर्मा, वेदांग करंदीकर, स्वराज मांजरे, श्रवण हांडे इत्यादींनी ७०+ किमी सायकल चालवली. मानसी फाटक, रिद्धिमा चव्हाण, अन्वय मंडलिक, वेद गोरीवले, आहान अमृते इत्यादी अनेकांनी ५०+ किमी सायकल चालवली. ७ वर्ष वयोगटातील छोटे सायकलस्वार आभा फाटक, अंश पांडे, आहान अमृते, पुस्कराज कदम, आराध्य गोरीवले, मेघराज कळंबकर, आदी भांबीड, प्रेम जाडे इत्यादींनाही गौरवण्यात आले.

या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, सुरज शेठ इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली.

तणावविरहित तंदुरुस्त आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि सायकल संस्कृती जपण्याच्या कार्यात सहकार्य करा असे आव्हाहन दापोली सायकलिंग क्लब तर्फे करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *