दापोली : वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन कार्यशाळा संपन्न

banner 468x60

वनविभाग दापोली आणि वाइल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यूअर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली याठिकाणी “वन्यजीव संरक्षण व संवर्धन” या विषयावर प्रबोधनपर कार्यशाळा घेतली.

या कार्यशाळेसाठी शाळेतील १०० विद्यार्थी उपस्थित होते. सर्प व इतर वन्यजीव दिसल्यावर नक्की काय करावे व काय करू नये, यासोबत कोणती काळजी घ्यावी याची सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी खेळीमेळीत संवाद साधत विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत माहिती देण्यात आली.

हि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी डॉ.शहारे, मरकड सर.डॉ. मोहोड डॉ. इंगळे, डॉ. सावंत, डॉ. जैन.डॉ. पूनम चव्हाण व प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेसाठी वनविभाग दापोली वनरक्षक शुभांगी भिलारे,

शुभांगी गुरव, सुरज जगताप, विश्वंभर झाडे तसेच निवेदिता प्रतिष्ठानच्या महेश्वरी विचारे मॅडम यांनी निसर्ग संवर्धन विषय माहिती दिली,वाईल्ड ऍनिमल रिस्क्युअर संस्थेचे मार्गदर्शक सुरेश खानविलकर, अध्यक्ष मिलिंद गोरीवले, उपाध्यक्ष मनीत बाईत सचिव तुषार महाडिक, सदस्य प्रितम साठविलकर, किरण करमरकर, अनिकेत जाधव, शामल साठविलकर यांनी मार्गदर्शन केले.

सामाजिक बांधिलकीतून सेवाभाव म्हणून निसर्गाप्रती व वन्यजीवांप्रती जनजागृती करून समाज प्रबोधनासाठी कार्यरत राहणे हेच वाईल्ड ऍनिमल रेस्क्यूअर या संस्थेचे आद्यकर्तव्य आहे

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *