दापोली : वाहतुक कोडींमुळे खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहनं दस्तूरी मार्गे वळवली

banner 468x60

दापोली खेड मुख्य रस्त्यावर वाहतुक कोडींमुळे खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक दस्तूरी मार्गे वळवली आहे. स्थानिक वाहनचालकांना आणि दापोलीला येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या खेड दापोली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

banner 728x90 banner 728x90


या सर्व बाबींचा विचार करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी केले आहेत.


वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि जनतेला माहिती देण्यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 116 अन्वये वाहतूक चिन्हे उभारण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत.

10 जून 2025 पर्यंत खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक खेड- दस्तुरी- पट्टणकोडोली- पालगड- सोंडेघर मार्गे दापोलीकडे आणि दापोलीकडून खेडकडे वळविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *