दापोली : टाळसुरे ग्रामपंचायतचा दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक, 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर

banner 468x60

दापोली : राज्य शासनाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव अभियान २०२३–२४ अंतर्गत दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत टाळसुरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीस 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

banner 728x90

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग, पायाभूत सुविधा विकास तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या निकषांमध्ये टाळसुरे ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्वांगीण विकासामुळे टाळसुरे गावाने दापोली तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.


या यशाबद्दल ग्रामपंचायत सरपंच पूर्वा संदिप सकपाळ, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच टाळसुरे गावातील जागरूक व सहकार्यशील ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


दरम्यान, या यशाबद्दल एल. एस. पी. मंडळ आष्टाची वाडी (पश्चिम) टाळसुरे तसेच महिला मंडळ यांच्या वतीने ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. टाळसुरे ग्रामपंचायतीने मिळवलेले हे यश इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *