दापोली : कट्टर कार्यकर्त्याला आलाय ‘भाव’, भाऊंच्या कट्टर कार्यकर्त्याला विविध पक्षांच्या ऑफर, घोडं अडलंय ‘एका’ गोष्टीवर

banner 468x60

दापोलीच्या राजकारणातील अलीकडेच आलेली स्थित्यंतर सगळ्यांना आवाक्यात टाकणारी आहेत. यामधील पहिली गोष्ट म्हणजे संजय कदम यांचं शिवसेनेत जाणं मात्र त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे योगेश कदम यांच्यासोबत जाणं आणि जुळवून घेणं.

banner 728x90

रामदास कदमांसोबत जुळवून घेणं हे संजय कदमांना कठीण नाही कारण मुळात त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात रामदास कदम यांच्यासोबत राहून केली. मात्र राजकीय विरोधक म्हणून योगेश कदम यांच्यासोबत उभं राहताना दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप आपण पाहिले आहेत.

संजय कदम हे शिवसेनेत गेले हे पटलं पण ते योगेश कदम आणि किंबहुना रामदास कदम यांच्यासोबत जाणं भाऊंच्या कार्यकर्त्याना पटलं नाही. संजय कदम यांनी त्यांची गणितं जुळवली आणि ते पक्षात गेले.

यामध्ये त्यांच्या व्यक्तीगत भूमिकेत त्यांनी काही चुकीचं केलं असं बिलकुल नाही राजकारणात राहताना टोकाची भूमिका ठेऊन कधीच चालत नाही. वेळेनुसार लवचिकता दाखवावी लागते .

मात्र यात सर्वात जास्त मरण होतं ते कार्यकर्त्यांचा. कार्यकर्ते हे जीवाचं रान करून आपल्या नेत्याचं काम करत असतात. मात्र नेत्याच्या भूमिका जेव्हा बदलतात तेव्हा सर्वात जास्त गोची होते ती कार्यकर्त्याची. मात्र कार्यकर्त्यांनी देखील जास्त भावनिक न होता आपली भूमिका घेणं महत्व्याचं आहे. आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते वाट्टेल त्याला नडतात टीका करतात संजय राऊत यांच्या सारखं पत्रकार परिषद घेऊन पक्षाला आणि आपल्या नेत्याला जिवंत ठेवण्याचं काम जसं करतात तसंच हे कार्यकर्ते फेसबुक पोस्ट करत टीका करतात.

माजी आमदार आणि आता शिवसेनेचे नेते संजय कदम यांचे कट्टर समर्थक अशी ज्याची ओळख आहे आणि सध्या त्यांची प्रचंड गोची झाली आहे असे मयूर रहाटे. मयूर राहाटेला आपल्या नेत्याची भूमिका कळली नाही मात्र पुढची राजकीय भूमिका काय घ्यायची हे कोडं अजून उलगडलेलं नाही.

नेत्यांनी आपली राजकीय गणितं मांडून आपला फायदा करून घेतला आता प्रश्न आहे कट्टर कार्यकर्त्यांचा. कट्टर कार्यकर्ते काय करणार, मात्र हे कार्यकर्ते जास्त भावनिक होतात आणि आपला राजकीय आणि आर्थिक करियर रसातळाला नेतात.

मात्र काही कार्यकर्त्यांच्या नशिबी काही ऑफर असतात तसंच काहीसं मयूर रहाटे याच्या बाबत झालं आहे. मयूर रहाटे याला सध्या विविध पक्षांच्या ऑफर आल्या आहेत. शिवसेना सोडून जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जवळीक साधल्याची माहिती आहे.

काही पक्षातील पदाधिकारी यांच्यासोबत बैठक देखील झाली आहे. त्या त्या तालुक्यातील काही पक्षांच्या प्रमुखांचे संपर्क सुरु आहेत. मयूर रहाटेला जरी नेत्याची राजकीय भूमिका कळली नाही मात्र स्वतःची राजकीय भूमिका कळली तरी खूप मोठं आहे अशी चर्चा सुरु आहे.

मयुर रहाटे याची दाभोळ बुरोंडीमध्ये जनसंपर्क असल्याने आणि जवळपासच्या गावातील प्रमुखांचे संपर्क असल्याने साधारण दाभोळ आणि दापोलीतील साधारण ९ ते १० गावांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे.

मात्र यामध्ये आर्थिक गणितामुळे घोडं अडलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या ऑफर आणि पक्षांच्या ऑफर यामध्ये सध्या तफावत असल्याने भाऊंचे कट्टर कार्यकर्ते आता कोणत्या पक्षात दिसतील हे सांगणं कठीण आहे. मात्र या सर्वात कट्टर कार्यकर्त्यांनी हातावर काढलेल्या टॅटूचं काय करणार हाही प्रश्न आहे. हातावरचं टॅटू मिटवणार की मग त्याच हातावर दुसऱ्या नेत्याचं नाव पाहायला मिळेल हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे जिथे आर्थिक गणित भक्कम थिते भाऊंचे कार्यकर्ते भक्कम दिसतील असे संकेत सध्या मिळू लागले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *