दापोली : अनियमित एस.टी.बसच्या सेवेमुळे दापोलीत प्रवाशांचे हालच हाल, एसटी प्रशासन झोपा काढतंय का ?

banner 468x60

गौरी गणपतीच्या सणानंतरही दापोली एस.टी.बस आगाराची सेवा अनियमित सुरू आहे. या अनियमित सेवेमुळे प्रवाशी वर्गाचे हालच हाल होत आहेत.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

दापोली तालुक्यासाठी असलेले दापोली शहरातील एस.टी. आगाराचा कारभार पूर्णपणे ढासळला असून कोणावर कोणाचेही अंकुश राहीलेले नाही त्यामुळे प्रवाशी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतो आहे.

दापोली एस.टी. आगाराचा कारभार सध्या राम भरोसे सुरू असून लांब पल्ल्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या नियमित एस.टी. बस या गौरी गणपतीच्या सणा नंतरही अनियमित सोडल्या जात असल्याने त्याचा फटका प्रवाशांना नाहक सोसावा लागत आहे.

दापोली शहरात असलेल्या शाळा, महाविद्यालयात, आयटी कॉलेज, व्यवसायिक कोर्सेस अथवा काम धंदा नोकरी निमित्त तसेच भाजीपाला विक्रीसाठी दापोलीत घेवून येणारे शेतकरी असतील किंवा सरकारी कामानिमित्त सरकारी आस्थापनेत कामासाठी ग्रामीण भागातून येणारे हे दापोलीत येण्यासाठीचा एस.टी. बसनेच प्रवास करीत असतात.

दापोलीत आलेल्यांना आपली कामे झाल्यानंतर परत आपल्या गावी परतीच्या प्रवासाठी जाण्यास नियमित बस दापोली एस.टी. आगाराकडून सोडल्या जात नसल्याने तासन तास एस.टी. बस स्थानकात तिष्ठतच थांबून राहावे लागते.

त्यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यव होतो. दापोली एस.टी.बसच्या निवारा शेडची धड सुधारणा झालेली नसल्याने प्रवाशांना उभे राहूनच तासन तास एस.टी.बसची वाट पाहत थांबावे लागते.

एकाच मार्गावर एस.टी.बसच्या अनेक फेऱ्या असल्याने वेळेत एस.टी. बस सुटल्या गेल्या नाहीत तर स्थानकात बस लागण्याच्यावेळी बसमध्ये जागा पकडण्यासाठी एकच गर्दी उसळते.

ही परिस्थिती केवळ एस.टी आगाराच्या भोंगळ कारभामुळे उद्भवते. आगार व्यवस्थापक आणि एकूणच एस.टी अधिकारी कर्मचारी यांच्या उदासीन भूमिकेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सण उत्सव दरम्यानच्या काळात ऐकवेळ प्रवाशी समजू शकतात मात्र कायमच अशी परिस्थिती उद्भवत असेल तर एस.टी. बसमधून प्रवास करण्याऐवजी प्रवासी खासगी वाहतुकीचा आसरा घेतील.

खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी दापोली एस.टी प्रशासनच प्रवाशांना भाग पाडत आहे. ही परिस्थिती बदलणार केव्हा.

सरकार पक्षातील लोकांच्या आशिर्वादाने दापोली एस.टी. आगारात काम करणारे अधिकारी कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत की फक्त एस.टी कडून पगार घेण्यापुरते मर्यादित आहेत असा प्रश्न दापोली एस.टी.आगाराचा कारभार पाहाता उपस्थित होत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *