दापोली : शिवसेना उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेससमध्ये प्रवेश, जिल्हाअध्यक्षा साधना बोत्रे आणि जिल्हा सरचिटणीस प्रिती जैन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

banner 468x60

सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असतानाच आता कोकणात मात्र आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मोठी मागणी आहे.

या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सध्या दापोलीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात दापोलीतील राजकारण ढवळून निघणार आहे. हर्णैमधील शिवसेना उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेससमध्ये प्रवेश केला आहे.

banner 728x90


जिल्हाअध्यक्षा साधना बोत्रे आणि जिल्हा सरचिटणीस प्रिती जैन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विचारधारेवर आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेऊन दापोली हर्णे बंदर मोहल्ला येथे नईम हुनेरकर यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंजर्ले, हर्णे पाज येथील महिला आणि युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.


यावेळी मंडणगड तालुका अध्यक्ष मुजफ्फर मुकादम, बिलाल मालुंकर, डी एम वागे, केशव वागे जिल्हाअध्यक्षा साधना बोत्रे,तालुका अध्यक्षा विनिता शिगवन जिल्हा सरचिटणीस प्रिती जैन, फैमिदा आरेकर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *