दापोली : “पतीच्या मारहाणीमुळे मी बाथरुमचे पाणी प्यायली” विवाहितेचा छळ, धमकी दिल्या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल, विवाहितेवर कौटुंबिक हिंसाचार

banner 468x60

गेल्या काही वर्षांपासून महिलांवर होणाऱ्या कौंटुबिक हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपाला कंटाळून विवाहित टोकाची पावले उचलल्याच्या घटना दररोज घडत आहेत.

banner 728x90

दापोलीत देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेचा शाररीक आणि मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे .

दापोलीतील नशेमन कॉलनीमधील एका विवाहित महिलेने आपल्या पती आणि सासरच्या सर्वांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दापोली शहर पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पत्नी वफा मुदसिर चिपळुणकर, वय 21 वर्षे यांनी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

26 जानेवारी 2025 ला वफा मुदसिर चिपळुणकर यांनी फिर्य़ाद दिली आहे. 21 वर्षीय सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्या प्रकरणी सासऱ्याच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार दापोलीतील नशेमन कॉलनी येथे घडला आहे.

तक्रारीनुसार मुदसिर शहाबुद्दीन चिपळुणकर, शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर फिरोजा शहाबुद्दीन चिपळुणकर, सबा शहाबुद्दिन चिपळुणकर सर्व रा. नशेगन कॉलनी दापोली यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पती – मुदस्सर शाबुद्दीन चिपळुणकर – वय २१
२) शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर – वय ७०
३) फिरोजा शाबुद्दीन चिपळुणकर – वय ५८
४) सबा शाबुद्दीन चिपळुणकर – वय १९
सर्व रा. नशेमन कॉलनी दापोली


दापोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा रजि. नं. 40/2025 बी.एन.एस कलम 352,115(2),351(2) अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार , याबाबत सविस्तर वृत्त आहे की
मागील 1 वर्षापासुन लहान सहान कारणावरुन चिपळूणकर कुटुंब वफाला त्रास देत आहेत.

दरम्यान एक दिवशी वफा ही 15 दिवसांपूर्वी तिचे माहेर चिपळुण येथे गेल्या होत्या. त्या कारणावरून सासरच्या लोकांनी राग येऊन रागाच्या भरात एकमेकांचे संगनमताने वफाला शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. वफाला हाताच्या थापटाने मारहाण करण्यात आली असून ठार मारण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान वफाला हाताने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी सुरूच आहे. एकदिवशी माझे पती मला घरात सोडुन बाहेर निघुन गेले. मी स्वयंपाक केला व बेडरुममध्ये गेले. सर्वांनी जेवण केले होते परंतु मी जेवण केले नव्हते. मी थोड्यावेळाने खाली आले तेव्हा जेवणाची भांडी तशीच होती.ती मी घासली व बेडरुम मध्ये गेले.

त्यादिवशी माझा नवरा रात्री १२.३० वा. च्या सुमारास घरी आला व काही कारण नसताना माझ्याकडे पैसे मागुन मला मारहाण करण्यास सुरुवात केली मी त्याला माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले तेव्हा त्याने मला माझ्या प्रापॅटि पेपर सही कर व तु निघुन जा असे बोलु लागला. मी त्याला सही करण्यास नकार दिला तेव्हा त्याने मला बेडरुमध्ये बंद करुन तो निघुन गेला.

बेडरुम मध्ये मला पिण्यास पाणी ही नव्हते म्हणुन मी बाथरुमचे पाणी पिले. सकाळी ०९.३० वा. चे सुमारास माझे पतीने येऊन बेडरुम चा दरवाजा उडला व परत मला मारु लागला त्यानंतर सासु आमचे बेडरुम मध्ये आली तिने ही प्रॉप्रटि पेपरवर सही कर असे म्हणुन माझ्या कानाखाली मारली तसेच पाण्याच्या रिकाम्या बॉटली फेकुन मारली.

दरम्यान सदरची एन.सी रजि दाखल करून एन. सीचा तपास वरिष्ठांचे आदेशाने मपोहेक /970 सुकाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

महिलांनो.. फोनमध्ये हे नंबर सेव्ह करून ठेवा

तुम्ही कधी विचार केला आहे का? की स्त्रिया अनेकदा कौटुंबिक हिंसाचाराला का बळी पडतात? बहुतांश घटनांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या का वाढतायत? महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवण्यासाठी सरकारकडून वेगळे कायदे करण्यात तर आले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जर तुम्हाला कौटुंबिक हिंसाचार किंवा कोणत्याही गैरवर्तनाचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही त्याबद्दल गप्प बसू नये. कारण, आज एक स्त्री गप्प राहिली तर उद्या इतर स्त्रियांनाही हा त्रास भोगावा लागेल.

  • घरात होत असलेल्या अत्याचारामुळे तुम्हाला त्रास होत असेल, 
    • तर तुम्ही 181/1091 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तुमची समस्या मांडू शकता. 
    • यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही हे लक्षात ठेवा. 
    • ही लाईन महिलांसाठी 24 तास खुली असते. 
    • महिलांवरील गुन्हे थांबवण्यासाठी हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. 
    • पण असे असूनही महिला फोन करायला घाबरतात. 

महिलांसाठी घरगुती हिंसाचार हेल्पलाइन

राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन- 7827170170
केंद्रीय समाज कल्याण मंडळ -पोलिस हेल्पलाइन क्रमांक – 1091/1291, (011) 23317004
नारी रक्षा समिती – (011) 23973949
तुम्ही यापैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुमची समस्या सांगितल्यास, पोलिस अधिकाऱ्यांकडून तुम्हाला तात्काळ मदत केली जाईल.

लॉयर्स कलेक्टिव्ह वुमेन्स राइट्स एलसी डब्ल्यूआरआय घरगुती हिंसाचार प्रकरणांसाठी विनामूल्य कायदेशीर मदत कक्ष देखील चालवते. ते घरगुती हिंसाचार प्रकरणांमध्ये कायदेशीर सहाय्य प्रदान करेल. यासाठी तुम्ही (011) 24373993/ 24372923 वर कॉल करू शकता.

banner 728x90

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *