दापोली : अनाथ वफा चिपळूणकर यांना न्याय मिळणार कधी ? गुन्हा दाखल मात्र संशयित आरोपी अजूनही मोकाट, बेल्टने मारहाण, चटके प्रकरण, दापोली पोलीसांची कारवाई कधी?

banner 468x60

बेल्टने मारहाण, चटके, जाळलं, प्रॉपर्टीसाठी वफाला छळलं अंगावर काटा आणणारी अनाथ वफा चिपळूणकर यांची दर्दनाक कहानी कोकण कट्टा न्यूजने समोर आणली मात्र वफा चिपळूणकर यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

banner 728x90

19 वर्षात लग्न 21 वर्षाच्या वफा चिपळूणकर यांची अंगावर काटा आणणारी स्टोरी समोर आली मात्र अजूनही दापोली पोलिसांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न वफा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.


कौटुंबिक हिंसाचार, धमकी दिल्या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दापोली पोलिसांनी याबाबतची नोटीस देखील चिपळूणकर यांच्या घरासमोर लावली आहे.

26 जानेवारी 2025 ला वफा मुदसिर चिपळुणकर यांनी फिर्य़ाद दिली आहे. 21 वर्षीय सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्या प्रकरणी सासऱ्याच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार दापोलीतील नशेमन कॉलनी येथे घडला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावं
पती – मुदस्सर शाबुद्दीन चिपळुणकर – वय २१
२) शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर – वय ७०
३) फिरोजा शाबुद्दीन चिपळुणकर – वय ५८
४) सबा शाबुद्दीन चिपळुणकर – वय १९
सर्व रा. नशेमन कॉलनी दापोली

एकीकडे दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारच्या घटना वाढू लागल्या आहेत. 21 वर्षीय विवाहित महिलेने या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतरही संशयित आरोपी अद्याप मोकाट असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


प्रॉपर्टीसाठी पत्नीला बेल्टने मारहाण, छळ, चटके देणं ही सगळी दुष्कृत्ये पतीने केली. १९ व्या वर्षी लग्न झालेल्या २१ वर्षाच्या वफा चिपळूणकर यांची ही अंगावर काटा आणणारी हृदयद्रावक घटना आहे. यासंबंधीची माहिती वफा यांनी दापोली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे.

मात्र अद्याप या प्रकरणातील संशयित आरोपी मोकाट आहे, असा आरोप वफा यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 1 आठवड्यापूर्वी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दापोलीतील नशेमन कॉलनीत राहणाऱ्या अवघ्या २१ वर्षाच्या वफा मुदस्सीर चिपळूणकर यांनी आपले हाल करण्यात आल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

अनाथ वफा चिपळूणकर यांना न्याय मिळणार कधी

वफा यांचे वडील इकबाल खान यांचा २०२१ मध्ये मृत्यू झाला. ३ महिन्यानंतर पुढे वफा यांच्या आई जरीना खान यांचा मृत्यू झाला. २२ नोव्हेंबर २०२३ ला वफा यांचा मुदस्सीर शहाबुद्दीन चिपळूणकर यांच्याजवळ विवाह झाला. प्रॉपर्टीसाठी त्याने वफा यांना बेल्टने मारहाण, छळ, चटके दिले. अखेर या सर्वाची तक्रार वफा चिपळूणकर यांनी पोलिसांत दिली आहे.

याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मात्र अद्याप दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीला अटक न केल्याने वफा यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे. तर एका महिलेला त्रास देणाऱ्या संशयित आरोपीला अद्याप दापोली पोलिसांनी ताब्यात न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वफा चिपळूणकर


वफा यांच्या तक्रारीनुसार मुदस्सीर शहाबुद्दीन चिपळूणकर, शहाबुद्दीन जाफर चिपळूणकर, फिरोजा शहाबुद्दीन चिपळूणकर, सबा शहाबुद्दिन चिपळूणकर यांच्याविरोधात दापोली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दापोली पोलीस व राज्य महिला आयोग आणि रत्नागिरी प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *