दापोली तालुक्यातील शिवनारी, आदर्शवाडी येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेले हे गृहस्थ गावातील मंदिरात पूजेसाठी गेले असताना हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, लव केशव सागवेकर (वय ५६, रा. शिवनारी, आदर्शवाडी) हे गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. १० मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते गावातील ग्रामदेवी मंदिरात नेहमीप्रमाणे पूजेसाठी गेले होते. परंतु,
मानसिक अवस्था ठीक नसल्याने वावरत असताना ते शिवनारी येथील करमरकर यांच्या ‘मच्छा’ नावाच्या ठिकाणच्या विहिरीत पाण्यात पडले. विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले. मात्र, दुपारी ३.२० वाजता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
या प्रकरणी मृताचा मुलगा ओंकार लव सागवेकर याने दिलेल्या माहितीनुसार दापोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














