माजी आमदार संजय कदमांनी रामदास कदम यांची भेट घेतल्यानंतर संजय कदम शिवसेनेत जाणार असल्याच निश्चित झालेलं असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हाकलपट्टी केली आहे.
🪀 Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक 👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/IaVL3jL1ZkCEwR0rxAPxA7
पक्ष सोडण्या आधीच उबाठाच्या शिवसेने कडून संजय कदम यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक जारी करण्यात आलेले आहे. माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्यामुळे वाडी वाडीत पंगा घेतलेल्या कार्यकर्त्यांना मात्र धक्का बसला आहे.
मात्र योगेश कदम आणि रामदास कदम यांना फेसबुकवर गरळ ओकणाऱ्या कार्यकर्त्यांना ही चांगली चपराक बसलीय. नेहमी कॉल आणि पोस्ट करणार्या कार्यकर्त्यांना तोंड दाखवायची जागा राहिली नाही.
कार्यकर्ते म्हणतात “माझी राजकिय भुमिका लवकरच स्पष्ट करेन,
आपल्या सगळ्यांचे प्रेम असेच मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.” आता यांना आपल्याच नेत्याची भूमिका समजली नाही आता हे कोणती भूमिका सांगणार असं शिवसेनेचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
पण या कोमात गेलेल्या कार्यकर्त्यांना राजकारणाच्या पडद्यामागच्या भूमिका कळत नाही असंच म्हणावं लागेल. दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं आहे की साहेबांच्या नावाचे टॅटू कधी मिटवणार असा मिश्किल टोला लागवला आहे. कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी संपर्क केला मात्र संजय कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.
यामधून आता स्पष्ट झालेलं आहे की संजय कदम येत्या दिवसात शिवसेनेत जाणार आहेत. दरम्यान कोकण कट्टा न्यूजच्या सूत्रांनुसार संजय कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती 13 मार्च रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र प्रवेशाची तारीख पुढे मागे होऊ शकते कारण राज्याचं अधिवेशन सुरु आहे मात्र संजय कदम पक्षप्रवेश नक्की करणार आहेत हे स्पष्ट झालं आहे.
एकेकाळी कट्टर विरोध असलेले एकमेकांचे तोंड न पाहणारे आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राजकारण एकत्र करत असताना पाहायला मिळत आहेत.
एके काळी माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम याचे कट्टर विरोधक असलेले संजय कदम आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
त्या आधीच त्याची उबाठा च्या शिवसेने कडून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक जारी करण्यात आलेले आहे. दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघांमध्ये कदम विरुद्ध कदम हा सामना गेल्या 8 वर्षांपासून सुरू आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्यामधील वाद अनेक वेळेला विकोपाला गेल्याचंही पाहिलं गेलं आहे.
परंतु सध्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
या पत्रकात म्हटले आहे की
जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरी (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*
Response (1)