दापोली : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘सन्मान नवदुर्गांचा’ उपक्रमांतर्गत महिलांचा गौरव

banner 468x60

दापोली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे ‘सन्मान नवदुर्गांचा’ या विशेष उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत महिला कर्मचारी, तसेच सामाजिक, वैद्यकीय आणि पोलिस क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्षा व दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका साधना बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल, आरोग्य यासह इतर शासकीय विभागातील महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन ‘नवदुर्गा’ म्हणून गौरविण्यात आले.

banner 728x90


यावेळी साधना बोत्रे म्हणाल्या, “महिला केवळ घरापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर समाजाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपली छाप पाडली आहे. सरकारी सेवेत आणि सामाजिक कार्यात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा महिलांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”


कार्यक्रमात वैद्यकीय सेवेत कार्यरत महिला डॉक्टर, परिचारिका तसेच महिला पोलिसांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी महिला सक्षमीकरण आणि समान हक्क यावर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या वेळी रमा बेलोसे, विनिता शिगवण, प्रीती जैन, वैदही महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *