दापोली तालुक्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, पुढील दोन दिवसांत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मधील कार्यकर्ते आणि माजी लोकप्रतिनिधींची दुसरी फळी एकत्रितपणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या संभाव्य पक्षप्रवेशामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य नेहा युवराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, युवक अध्यक्ष विजय मुंगसे, आसूदचे उपसरपंच कडू तसेच पिंट्या माने यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे दापोलीच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, एका पक्षातील कार्यकर्त्यांची संपूर्ण दुसरी फळी माजी लोकप्रतिनिधींसह पक्षांतर करणार असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष आता या मोठ्या घडामोडीकडे लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














