दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

banner 468x60

दापोली:-८ मार्च महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार रत्नागिरी जिल्हाच्या वतीने दापोली येथे दापोली शहरातील शिंदे सेवावृत्ती सभागृहात महिला नागरी सत्कार तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

banner 728x90

यामध्ये विविध क्षेत्रातील 25 महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सुरुवातीला प्रदेश प्रवक्ते माधव शेटे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.

त्यानंतर तालुकाध्यक्ष श्री. सचिन तोडणकर यांनी शेतीपूरक असे योग्य मार्गदर्शन केले.यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 25 महिलांचा यावेळी स्मृतीचिन्ह व केळीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच यावेळी दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. ममता बिपीन मोरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर

प्रदेशउपाध्यक्ष सुजाता तांबे तालुकाध्यक्ष निशा सावंत जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर जिल्हासदस्य आशा महाडिक देवरुख तालुका अध्यक्ष दीपिका किर्वे खेड तालुकाध्यक्ष तेजा बैकर अंजली बेकर प्रियंका चव्हाण सोनाली आडविलकर तसेच प्रदेश प्रवक्ते श्री माधव शेटे तालुकाध्यक्ष सचिन तोडकर शहराध्यक्ष खलील डिमडीमकर रहूफ काझी शहाबुद्दीन बर्डे खजिनदार दिनेश महाडिक आधी महिला कार्यकर्त्या बहुसंख्य उपस्थित होत्या.

तशेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष सौ निशा सावंत यांनी केले. यावेवेळी कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांना केळीचे रोप घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *