दापोलीच्या राजकारणात मोठा फेरबदल घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षाचे हर्णै गणातून निवडून आलेले एकमेव पंचायत समिती सदस्य तुलसा भरत जाधव यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

दापोली तालुक्यातील हर्णै गणातून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य तुलसा भरत जाधव यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, ही जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे यांनी मोठी मेहनत घेतली होती. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करत, कार्यकर्त्यांना एकत्र आणत त्यांनी ही जागा पक्षाकडे राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जाधव यांचा अचानक घेतलेला निर्णय पक्षासाठी अनपेक्षित मानला जात आहे.

मुंबई येथे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे दापोली तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुलसा जाधव यांच्या प्रवेशामुळे हर्णै परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर संघटनात्मक फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या वेळी जि.प. माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, शिवसेना हर्णै गण समन्वयक सोमनाथ पोशिराम पावसे, बंदर समिती अध्यक्ष बाळकृष्ण नागू पावसे, तसेच भास्कर वाघे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















