दापोली हत्या प्रकरण – दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी : पत्नीने केली पतीची हत्या, अनैतिक संबंधातून हत्या नेहा बागकर आणि आणि मंगेश चिंचघरकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी, हत्या कशी केली घटनाक्रम पाहा

banner 468x60

दापोलीत प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी नेहा बागकर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत आणखी काही गोष्टींचा खुलासा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा आहे असे समजून नेहाने मंगेशला हाताशी धरून पती नीलेश बागकरचा काटा काढला. सध्या मंगेश आणि नेहा दोघेही पोलीस कोठहीत आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडून आणखी काही खुलासे होतात का?

banner 728x90

खून करण्याचे नेमके कारण काय? खून मंगेश व नेहा या दोघांनीच केला का? नीलेशचा खून हर्णे येथे केल्यावर त्याचा मृतदेह 33 किलोमीटर दूर एका विहिरीत नेऊन टाकण्याचे कारण काय? मृतदेह वाहून नेलेली गाडी नेमकी कुणाची? इत्यादी बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

एक धक्कादायक घटना आहे दापोलीतील गिम्हवण्यामधील. प्रेम प्रकरण आणि पतीची केलेली हत्या. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केला आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना दापोलीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दरम्यान या सर्वांचा घटनाक्रम कसा आहे ते आपण सविस्तर पाहूयात


त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा ही जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टाइमिंग व तिने पोलिसांना चौकशी सांगितलेले टाइमिंग यामध्ये तफावत आढळताच पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला.

यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं मात्र बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीचा पोलिसी हिसका दाखवताच त्यावेळी तिने या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांना दिली आहे. यावेळी कार मध्ये बसलेला निलेश व त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही सीसीटीव्ही फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आले आहे.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशला पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेश चा मृतदेह कमरेला लोखंडी पाटा वस्तू बांधून टाकून देण्यात आला अशी ही कबुली नेहा बागकर हिने पोलीस तपासात दिली आहे.

त्यानंतर तात्काळ पोलिसात पथकाने पालघर येथील विहिरीत गळ टाकून हा निलेश याचा मृतदेह बाहेर काढला आहे. पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले

त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. अधिक तपास केल्या नंतर मुरुड येथील एका बियर शॉपीवर नेहाने बियर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आले, आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे.

यावेळी नेहाचा प्रियकर संशयित मंगेश हा फरार झाला होता. त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावत दापोली एसटी डेपोतून एका

बंद गाडीमध्ये बसला होता त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली आहे. दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हत्या करणे, हत्येचा कट रचणे,पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे ,सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला आहे. दरम्यान, पत्नी व प्रियकराने निलेश याचा नायलॉनच्या दोरीने गळा वळून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *