दापोली : मिनी महाबळेश्वरचा पारा चढाच

banner 468x60

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील पारा ३५ ते ३७ अंशात राहिला आहे. त्याचा परिणाम नागरी जीवनावरच नव्हे तर पशुपक्ष्यांवर झाला आहे.

banner 728x90


सकाळी नऊ वाजेपर्यंत हवेत गारवा असतो तर त्यानंतर उन्हाच्या झळांना सुरवात होते. परिणामी, दापोलीतील रस्ते दुपारी सुनसान होतात. दहावी, बारावीच्या परीक्षांबरोबरच कडाक्याच्या उन्हामुळेही पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. हिवाळा संपत आल्याचे संकेत मिळू लागल्याने समुद्रकिनाऱ्यावर दिसणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या संख्येतही घट होऊ लागली आहे.


दापोलीत पारा रात्री १० अंशाखाली तर दिवसा ३५ ते ३७ अंशापर्यंत वर जात आहे. मागील २४ तासात कमाल तापमान ३६.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १०.० अंश सेल्सिअस इतके आहे. सकाळी साधारण नऊ वाजेपर्यंत १००० त्यानंतर कडाक्याचे ऊन अशी स्थिती आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात. गेल्या वर्षी याच दरम्यान कमाल तापमान ३३.५ तर किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस होते.


गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये निसर्गसौंदर्याने नटलेले येथील डोंगर जंगलतोडीमुळे उघडे पडू लागले आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला असून, मिनी महाबळेश्वर तापू लागले आहे. येथील तापमान आता ४० अंश डिग्रीपर्यंत जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सकाळी थंड वातावरणामुळे सीगल पक्षी किनाऱ्यावर येतात त्यानंतर ते किनाऱ्यावरील सुरूबनात निघून जातात.

मागील आठवड्यात हर्णे, मुरूड, पाळंदे या किनाऱ्यांवर सीगल पक्ष्यांचे प्रमाण कमी दिसत होते. कदाचित ते उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागल्यामुळे परतीच्या प्रवासाला लागले असावेत, अशा अंदाज व्यक्त केला जात आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *