दापोली : मटका जुगार खेळताना एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले

banner 468x60

दापोली शहरात अवैध मटका जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीला दापोली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आरोपीकडून पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली शहरातील पथीक हॉटेलच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये एका टपरीच्या आडोशाला आरोपी निलेश विद्याधर तवसाळकर (वय ४९ वर्षे, रा. पाळंदे भंडारवाडा, सध्या रा. आनंदवन जालगाव दापोली) हा बेकायदेशीरपणे बिगर परवाना मटका जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र तुकाराम नलवडे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी आरोपी निलेश तवसाळकर हा मटका जुगार खेळताना मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७९०/- रुपये रोख रक्कम आणि ०७/- रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य, असे एकूण ७९७/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र नलवडे यांच्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *