दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर दापोलीच्या नगराध्यक्षपदी कोण बसेल अशी चर्चा सुरू असतानाच मी दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार अद्याप सोपवलेला नसल्याचं नगराध्यक्षा ममता मोरे यांची म्हटलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं आज, 15 मे 2025 रोजी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांना पदाचा कार्यभार सोपवण्याबाबतचे पत्र ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या हातात असे कोणतेही पत्र अद्याप आलेले नाही.
कार्यभार सोपवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असं ममता मोरे यांनी सांगितलं. दरम्यान 5 मे 2025 रोजी नगरपंचायतीत त्यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाविरोधात त्या उच्च न्यायालयात गेल्या आहेत. हा विषय सध्या प्रलंबित असल्याने पुढील निर्णयाबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र हे जरी असलं तरी जिल्हाधिकारी कार्यालयातून एक आदेशाचं पत्र देण्यात आलं आहे ज्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे अधिनियमातील कलम ५७ मधील तरतुदीनुसार.
ममता बिपीन मोरे तत्कालिन अध्यक्ष, दापोली नगरपंचायत यांनी. खालीद अब्दुल्ला रखांगे उपाध्यक्ष, दापोली नगरपंचायत यांच्याकडे दापोली नगरपंचायत अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवावा असं म्हटलं आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेला पत्र :
महाराष्ट्र शासन
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी
- नगरपालिका प्रशासन शाखा
रुम.नं.१०५, पहिलामजला, नवीनप्रशासकीयइमारत, जयस्तंभ, ता.जि.रत्नागिरी
ई-मेल आयडी:-dpoduda.ratnagiri@gmail.com
स्वरित श्रीराज्याभिषेक शके ३५०
क्रमांकः नपाप्र १/दापोली नपं/अध्यक्ष कार्यभार/१०४/२०२५
दिनांक:१५/०५/२०२५
संदर्भ – १
. दापोली नगरपंचायती कडून विशेष सभेचे प्राप्त इतिवृत्त जा.क्र./दानपं/कावि/२६५/२०२५ दिनांक ०५/०५/२०२५.
२. नगरपंचायत दापोली यांचे कार्यालयाकडील पत्र जा.क्र./दानपं/कावि/२७५/२०२५ दिनांक ०६/०५/२०२५.
- आदेश –
दापोली नगरपंचायत, जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमान सदस्यांमार्फत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ब-५” (सुधारित राजपत्र दिनांक १५ एप्रिल, २०२५) अन्वये दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्षांस पदावरून दूर करणेबाबतचे मागणीपत्र दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्राप्त झाले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने अधिनियमातील नमुद तरतुदीनुसार विशेष सभा दिनांक ०५/०५/२०२५ रोजी घेण्यात आली. प्राप्त इतिवृत्ताप्रमाणे विशेष सभेत दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान अध्यक्षांस पदावरुन काढून टाकणेची मागणी करणारा ठराव १६ विरुध्द ०१ अशा एकुण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांच्या बहुमताने मंजूर करण्यात आला. सदर विशेष सभेत झालेल्या अविश्वास ठरावाने दापोली नगरपंचायतीचे अध्यक्ष पद रिक्त झाले आहे.
नगरपंचायत दापोली यांचे कार्यालयाकडील पत्र जा.क्र./दानपं/कावि/२७५/२०२५ दिनांक ०६/०५/२०२५ दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार अधिनियमातील धनियमातील तरतुदीनुसार तरतुदीनुसार उपाध्यक्ष उपाध्यक्ष दापोली दापोली नगरपंचायत यांचेकडे सोपवला नसल्याचे कळविले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे अधिनियमातील कलम ५७ मधील तरतुदीनुसार, श्रीम. ममता बिपीन मोरे तत्कालिन अध्यक्ष, दापोली नगरपंचायत यांनी श्री. खालीद अब्दुल्ला रखांगे उपाध्यक्ष, दापोली नगरपंचायत यांच्याकडे दापोली नगरपंचायत अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवावा.
(एम. देवेंदर सिंह) जिल्हाधिकारी, रत्नागिरी
प्रत – १. श्रीम. ममता बिपीन मोरे सदस्य नगरपंचायत दापोली.
२. श्री. खालीद अब्दुल्ला रखांगे उपाध्यक्ष, दापोली नगरपंचायत.
२/- दापोली नगरपंचायत अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारुन अहवाल तात्काळ या कार्यालयात सादर करावा.
३. मुख्याधिकारी, नगरपंचायत दापोली.
ममता मोरे यांनी काय म्हटलं पाहा :
मी ममता बीपीन मोरे नगराध्यक्ष दापोली माझ्या विरोधात पाच तारखेला अविश्वास ठराव मंजूर झाला अशा पद्धतीने प्रशासन कडून भासविले जाते.
परंतु प्रत्यक्षात तसा प्रस्ताव सभागृहात मांडला गेलाच नाही म्हणून या बेकायदेशीर प्रस्तावाच्या विरोधात मी
नगरविकास मंत्रालय,
माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे अपिलात आहे .
मी आज रोजी सदर कामासाठी मुंबईत असताना मला कोणत्याही प्रकारचं
मा.जिल्हाधिकारी ,
प्रांत अधिकारी , सीओ
यांचे पत्र प्राप्त झालेले नाही. परंतु जे कार्यालयीन आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत त्यामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष यांनी उपनगराध्यक्ष यांच्याकडे कार्यभार सोपवावा असं म्हटलेलं आहे
तथापि मी कोणत्या प्रकारचा कार्यभार सोपवलेला उपनगराध्यक्ष यांच्याकडे सोपविलेला नसताना प्रशासन व उपनगराध्यक्ष यांना काय घाई लागली आहे याच्या बाबतीत मी अचंबित आहे.
प्रशासन ,उपनगराध्यक्ष यांनी सबुरीने घ्यावं
त्यामुळे सध्या दापोली नगराध्यक्षपदा बाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीय.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*