दापोली शहराजवळील वळणे मिनी एमआयडिसितील एका काजू फॅक्ट्रीत आज दुपारी ११.३० च्या सुमारास लिफ्टचा हुक तुटून लिफ्ट एका महिला कर्मचाऱयाच्या अंगावर पडून या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वळणे एमआयडीसी येथील एका काजू फॅक्टरीत प्रविणी प्रभाकर कासेकर या आज दुपारी 11.35 चे सुमारास लिफ्टच्या खाली पडलेल्या काजूच्या बिया झाडूने जमा करत असताना अचानक लिफ्टचा हुक तुटून ही लिफ्ट कासेकर यांच्या
अंगावर पडली त्यात प्रविणी कासेकर या जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले,
या घटनेची दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक अमोल गंगधर करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















